नवी दिल्ली : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घेतल्या गेलेल्या भूमिकेवरुन महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. दरम्यान इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीला १९ पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना , मोदी सरकाकडून आणले जाणारे बील घटनाविरोधी असून सध्याच्या ५४३ जागांमधूनच महिला आरक्षण देण्याची भूमिका विषद केली.
दरम्यान शरद पवार यांच्या तब्येतीचे कारण देऊन सुप्रिया सुळे यांनी बैठकीला जाण्याचे टाळले. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके दिल्लीला बैठकीसाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनीही ऐनवेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिल्याने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना थेटपणे दुजोरा मिळालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे.
गेल्यावेळी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होऊ नये यासाठी इंडिया आघाडीने एकजुटीने प्रयत्न केले. इंडिया आघाडीच्या एकसंधपणामुळे भाजपला बॅकफूटला जावे लागले. मात्र यावेळी छोट्या पक्षांशी बोलून, त्यांना राजी करून केंद्र सरकारने विधेयक आणल्याचे दिसून येते. यंदा द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, तृणमुलचा बंडखोर गट असे पक्ष केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मसुदा आल्याशिवाय पाठिंबा देणार की नाही यार चर्चा करणे बरोबर नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. मात्र आता इंडिया आघाडीने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारून राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे पाठिंब्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीचा प्रवास सत्तेच्या दिशेने?
विधेयक मंजूर होऊ नये यासाठी इंडिया आघाडीने कंबर कसलेली असताना इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मात्र सत्ताधार्यांना अनुकूल भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. गेल्या काही दिवसापांपासून राष्ट्रवादी थेटपणे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत बसेल, अशा चर्चा होत असताना आता विधेयकाला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी त्या दिशेने मार्गक्रमण करतेय की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
राष्ट्रवादीत पडले दोन गट...
सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पक्षाची असलेल्या संस्पेन्स भूमिकेने काही नेत्यांच्या मनात खदखद आहे. आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे. त्यानंतर आता या विधेयकावरूनही अद्याप सस्पेन्स आहे. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने नेत्यामध्ये नाराजी आहे.
याबात काही आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेकडे नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदारांनी एकनाथ शिंदेकडे आपली ही खदखद व्यक्त केली आहे. ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुले आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुले आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.